२ टक्के पाद्री लैंगिक शोषण करतात - पोप

By Admin | Updated: July 14, 2014 10:21 IST2014-07-14T10:21:14+5:302014-07-14T10:21:34+5:30

कॅथलिक चर्चमधील सुमारे २ टक्के पाद्री लैंगिक शोषण करत असतील असे धक्कादायक विधान ख्रिश्चन धर्मीयांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी केले आहे.

2 percent of clerics sexual abuse - Pope | २ टक्के पाद्री लैंगिक शोषण करतात - पोप

२ टक्के पाद्री लैंगिक शोषण करतात - पोप

ऑनलाइन टीम

व्हॅटिकन सिटी, दि. १४ - कॅथलिक चर्चमधील सुमारे २ टक्के पाद्री लैंगिक शोषण करत असतील असे धक्कादायक विधान ख्रिश्चन धर्मीयांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी केले आहे. पाद्रींना विवाह करण्याची परवानगी देणे हाच यावर उत्तम पर्याय असल्याची सूचनाही फ्रान्सिस यांनी केली आहे. 

इटलीतील एका वृत्तपत्राला फ्रान्सिस यांनी मुलाखात दिली असून यात त्यांनी लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची तुलना थेट कुष्ठरोगाशीच केली आहे. लहान मुलांचे लैंगिक शोषण कदापी सहन केले जाणार नाही असा इशाराही फ्रान्सिस यांनी दिला आहे. जगभरातील ४ लाख १४ हजार पाद्रींपैकी सुमारे ८ हजार पाद्रींवर लैंगिक शोषणाचा आरोप असतील अशी माहिती सल्लागारांकडून मिळाली आहे असा गौप्यस्फोट फ्रान्सिस यांनी केला आहे. या दोन टक्क्यांमध्ये पाद्री, बिशप आणि कार्डिनल या सर्वांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फ्रान्सिस यांच्या विधानाने जगभरात खळबळ माजली आहे. 

Web Title: 2 percent of clerics sexual abuse - Pope