(Image Credit : CEN/ConselldeMallorca/IBEAM)
समुद्राच्या तळाला कधी-कधी अशा वस्तू सापडतात की, त्या बघितल्यावर डोकं चक्रावून जातं. स्पेनच्या बेलेरिक आयलॅंडच्या मेजोरका तटावर असंच काहीतरी हैराण करून सोडणारं आहे. इथे १७०० वर्ष जुनं समुद्रात बुडालेलं जहाज सापडलं आहे. सोबतच जहाजावर रोमन काळातील १०० पेक्षा अधिक भांडी सापडली असून अजूनही ही भांडी सुरक्षित आहेत.
हे जहाज फेलिक्स अलारकोन आणि त्यांच्या पत्नीने जुलै महिन्यात शोधलं होतं. जे ३३ फूट लांब आणि १६ फूट रूंद आहे. असं मानलं जात आहे की, या जहाजावर काही बरण्या सापडल्या असून याचा वापर ऑलिव्ह ऑइल, माशांची चटनी आणि मद्य ठेवण्यासाठी केला जात होता.
मीडिया रिपोर्टनुसार, समुद्रात हजारो वर्ष पडून राहिल्यामुळे या बरण्यांमध्ये पाणी आणि मीठ जमा झालं आहे. त्यामुळे यातील दोन बरण्या अजून उघडता आल्या नाही.
तज्ज्ञांनुसार, या बरण्यांना चार महिने स्वीमिंग पूलमध्ये ठेवलं जाईल. जेणेकरून त्यांच्यावर जमा झालेलं मीठ दूर व्हावं. घाई गडबडीत बरण्या तुटू नये म्हणून यासाठी इतका वेळ घेतला जात आहे.
या बरण्यांवर लिहिलेल्या लेखांनाही अजून वाचण्यात आलेलं नाही रिपोर्ट्सनुसार, या बरण्या मेलोर्काच्या संग्रहालयात पाठवण्यात आल्या आहेत. इथे संशोधक हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील की, हजारो वर्षांपूर्वी लोक वस्तू सुरक्षित कसे ठेवत होते.