१२ वर्षांच्या मुलाने चालविली बस

By Admin | Updated: July 8, 2017 00:42 IST2017-07-08T00:42:49+5:302017-07-08T00:42:49+5:30

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात एक १२ वर्षांचा मुलगा बस चालवताना दिसत आहे. ही घटना आहे चीनमधील.

A 12-year-old boy ran the bus | १२ वर्षांच्या मुलाने चालविली बस

१२ वर्षांच्या मुलाने चालविली बस

बीजिंग : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात एक १२ वर्षांचा मुलगा बस चालवताना दिसत आहे. ही घटना आहे चीनमधील. या मुलाने ४० मिनिटे ही बस चालविली तेव्हा येथील पोलीस विभागाचीही या घटनेने धावपळ झाली. चीनमधील रोडवर हा मुलगा लक्झरी बस चालवत होता तेव्हा पाहणाऱ्याच्या अंगाचा थरकाप उडाला. जो तो या मुलाला रस्त्यावरुन जागा करुन देत होता. पोलिसांनी जीपीएस सिस्टिमने या मुलाला ट्रक केले आणि तब्बल ४० मिनिटांचा हा थरार थांबला. पोलीस या मुलाला घेऊन नंतर पोलीस ठाण्यात गेले. याच वेळी काही लोकांनी या मुलाचा व्हिडिओ तयार केला. असे सांगितले जात आहे की, या मुलाने ही बस चोरली होती. या बसची काच फुटलेली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सुदैवाने यावेळी कोणताही अपघात झाला नाही. पोलिसांनी या मुलाला थांबविल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

Web Title: A 12-year-old boy ran the bus