वाह रे नशीब! ११ महिन्यांचं बाळ रातोरात झालं कोट्यधीश, ७ कोटी रूपयांची लागली लॉटरी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 02:54 PM2020-02-07T14:54:02+5:302020-02-07T15:19:08+5:30

एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा ११ महिन्यांचा मुलगा झाला कोट्याधीश.

11-month-old baby from Kerala wins $1 million at Dubai Duty Free raffle | वाह रे नशीब! ११ महिन्यांचं बाळ रातोरात झालं कोट्यधीश, ७ कोटी रूपयांची लागली लॉटरी! 

वाह रे नशीब! ११ महिन्यांचं बाळ रातोरात झालं कोट्यधीश, ७ कोटी रूपयांची लागली लॉटरी! 

Next

(Image Credit : onelotto.com)(प्रातिनिधीक छायाचित्र)

संयुक्त अरब अमीरातमधील एका परिवारातील केवळ ११ महिन्यांच्या बाळाला १ मिलियन डॉलर म्हणजे ७ कोटी रूपयांची लॉटरी लागली. हे बाळ १३ फेब्रुवारीला १ वर्षाचं होईल. हे कुटूंब मुळचं भारतीय असून या बाळाचे वडील दुबईमध्ये एका प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउन्टटचं काम करतात.

रमीज रहमानने ही लॉटरी त्याचा मुलगा मोहम्मद सलाहच्या नावाने खरेदी केली होती. त्याने सांगितले की, मला अजूनही विश्वास बसत नाहीये. मी ही ऑनलाइन लॉटरी तिकिट गेल्या महिन्यात माझ्या मुलाच्या नावाने खरेदी केली होती.

गल्फ न्यूजने दिलेल्या रिपोर्टनुसार, रमीज रहमान हा मुळचा भारतीय असून केरळ येथील आहे. त्याने सांगितले की, तो गेल्या १ वर्षांपासून लॉटरी खरेदी करत आहे. यावेळी त्याने मुलाच्या नावाने लॉटरी घेतली. त्याने ३२३ सीरीजची १३१९ नंबरची लॉटरी खरेदी केली होती.

रहमानच्या तिकिटाच्या लकी ड्रॉची घोषणा मंगळवारी होणार होती. मिलेनियम मिलेयनेअर ड्रॉनंतर तीन इतर विजेत्यांची नावे दुबई ड्यूटी फ्री फाइन सरप्राइज प्रमोशनमध्ये घोषित करण्यात आली.

एकाला मिळाली मर्सिडीज बेन्झ

मंगळवारी लकी ड्रॉ मध्ये तीन लोकांनी लक्झरी कार जिंकल्या. डीडीएफचे इतर विजेत्यांमध्ये ३३ वर्षीय शागयघ अतरजादेह होते. ते दुबईमध्ये इराणी प्रवासी आहेत. त्यांनी याच सीरीजची १७४५ नंबरची लॉटरी खरेदी केली होती. त्यावर त्यांना मर्सिडीज बेन्झ ही कार मिळाली.


Web Title: 11-month-old baby from Kerala wins $1 million at Dubai Duty Free raffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.