जळगाव : जि.प.च्या शाळांची खासगी शाळांंशी गुणात्मक स्पर्धा व्हावी, यासाठी मार्च अखेरपर्यंत १५० शाळा ‘मॉडेल स्कूल’ करण्याचे उदिष्ट निश्चित केले आहे. या उद्दीष्टानुसार प्रत्येक तालुक्यातुन १० शाळांची निवड करण्यात आली आहे. यादृष्टीने कार्यवाहीसाठी लवकरच तालुकास्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.या शाळांची झाली निवडअमळनेर तालुका- निंभोरा, नंदगाव, शिरूड, सडावण, टाकरखेडा, पातोंडा कन्या, रणाईचे, गलवाडे, मठगव्हाण, जवखेडे. भडगाव तालुका- सावदे, गुढे बॉईज, महिंदळे, पांढरद, बांबरूड बु. पिंपरखेड, कजगाव मुलांची, कन्या नं१, उर्दु यशवंतनगर. भुसावळ तालुका- कन्हाळे, खंडाळे, गोजोरे, फुलगाव, पिंप्रीसिकम, साकरी, शिंदी, तळवेल कन्या, वझरखेडे, सिध्देश्वरनगर. बोदवड तालुका- शेलवड, कुºहेरदो, वराड बु., मनुर बु, मुक्तळ, सुरवाडे बु, जुनोने दिगर, मुलींची शाळा नं १ बोदवड, कोल्हाडी, चिखली बु. चाळीसगाव तालुका- बाणगाव, बोरखेड बु.वाडाळा, शिवापुर, टाकळी प्रदे, आडगाव, टाकळी प्रचा, गणेशपुर, दस्केबर्डी, जामडी उर्दु. चोपडा तालुका- वराड, धानोरा, वेले, काळेबा, माचला, कुसुंबा, चौगाव, पुनगाव, कुरवेल, गणपुर, मंगरूळ. धरणगाव तालुका- शेरी, बांभोरी बु.नांदेड कन्या, सोनवद बु.पाळधी, झुरखेडा, वराड बु, उर्दु नं १ धरणगाव, निंभोरा, पिंप्री. एरंडोल तालुका- भातखेडा, उत्राण, निपाणे, जवखेडासिम, खडकेसिम, खर्ची बु,खेडी, कढोली, पिंपरी बु, एरंडोल २ उर्दु, जळगाव- भोलाणे, नशिराबाद, कानळदा कन्या, पिलखेडा, रायपुर, कुंसुबे खुर्द, मोहाडी, कन्या नं १ शिरसोली. जामनेर तालुका- हिवरखेडा, बेटावद बु.पिंप्री, अंबेलहोलदेवी, हिवरखेडा, भराडी, चिंचखेडा बु., लेलेनगर, सोनाळे, लोणी. मुक्ताईनगर तालुका- पातोंडी, चिखली, मानेगाव, कोथळी, धामणगाव,पिंप्रीनांदु, उचंदा, टाकळी, जोधनखेडा, कुºहा उर्दू. पाचोरा तालुका- बाळद, निपाणे, गोतडखेडे, कडगावकडे, नांद्रा, म्हसास, लासगाव, सातगाव (डोंगरी), वरखेडी, उर्दु पिंपळगाव हरे. पारोळा तालुका- सांगवी, भिलाली, बहादरपुर, मुदाणेकरंजी, लोणीग्रृप, पारोळा शाळा क्र २, राजवड, शिरसमणी, उर्दु उंदीरखेडे, शिवरेदिगर. रावेर तालुका- मोरव्हाल, दसनुर, अभोळा बु, सावखेडा, चिनावल कन्या, रसलपुर बॉईज उर्दु, निंबोल, उदळी, उटखेडा. यावल तालुका- दहीगाव, उर्दु बॉईज नं १, गाडऱ्या, अंजाळे, कोळन्हावी, कासवा, हिंगोणे बॉईज, कठोरा, थोरगव्हाण, कन्या नं १ फैजपुर आदी १५० शाळांचा समावेश आहे.
जि.प.च्या १५० शाळा होणार ‘मॉडेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:13 IST
प्रत्येक तालुक्यातून १० शाळा
जि.प.च्या १५० शाळा होणार ‘मॉडेल’
ठळक मुद्देकार्यवाहीसाठी लवकरच बैठक