शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी युवकाची सायकलवरुन देशभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 10:20 PM

जळगाव : विकासकामांसाठी झाडे तोडण्यात येत असल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत आहे. तापमानाचे प्रमाण वाढत असून, जंगलातील प्राणी ...

जळगाव : विकासकामांसाठी झाडे तोडण्यात येत असल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत आहे. तापमानाचे प्रमाण वाढत असून, जंगलातील प्राणी मानवीवस्तीत येत आहे. त्यामुळे भविष्यात याचा मानवावर परिणाम होणार असून, आतापासून प्रत्येकाने झाडे लावावीत आणि झाडे जगवावीत. हा संदेश देण्यासाठी राजस्थानातील उच्चशिक्षित युवकाने सायकलवरुन देशभ्रमंती सुरु केली आहे. जम्मू काश्मीर पासून देशभ्रमंतीला सुरुवात केली असून, आतापर्यंत १२ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.नरपत सिंहज राजपुरोहित असे या युवकाचे नाव असून, रविवारी सायंकाळी देशभ्रमंती करत चोपड्याहून जळगावात दाखल झाले होते. नरपत यांचे राजस्थानातील ढाणी जिल्ह्यातील लंगेरा हे गाव असून, त्यांनी इयत्ता १२वीनंतर दोन वर्षांचे तांत्रिक शिक्षण घेतले आहे. लहानपासूनच झाडे लावून, ती जगविण्याचा छंद असल्यामुळे, इतरानींही झाडे लावून, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडे लावण्याचे आवाहन नरपत हे करत आहेत.या देशभ्रंतीच्या यात्रेला त्यांनी जम्मू विमानतळावरुन २७ जानेवारी २०१९ला सुरुवात केली आहे. या ठिकाणाहून त्यांनी काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, युपी, उत्तराखंड, राजस्थान, गुजरातमार्गे महाराष्ट्रात दाखल झाले आहे. रविवारी चोपडा येथून, सायंकाळी जळगावात आले होते.नरतप यांनी सांगितले की, सायकल भ्रमंती करतांना एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व सांगत असल्याचे सांगितले. दररोज दीडशे किलोमीटरचा प्रवास करित असून, वाटेत कुठेही साधे जेवण घेतो. सायकल रस्त्यात कुठे पंक्चर झाल्यास, पंक्चर काढण्याचे साहित्य, पाण्याची बाटली व रात्री निवाऱ्यासाठी अंथरुण ऐवढीच शिदोरी आपल्यासोबत असल्याचे नरपत यांनी सांगितले.

टॅग्स :CyclingसायकलिंगJalgaonजळगाव