वडगाव येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 16:20 IST2019-04-20T16:20:08+5:302019-04-20T16:20:43+5:30

पारोळा तालुक्यातील घटना

The youth's death in the well in Wadgaon, after the death of the youth | वडगाव येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

वडगाव येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू


पारोळा : तालुक्यातील वडगाव येथे नाना पंडित भिल या ३५ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
उमरे, ता.एरंडोल येथील रहिवाशी नाना पंडित भिल हे गेल्या दोन दिवसांपासून घरून गेले होते. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास वडगाव, ता.पारोळा येथील जगन चव्हाण यांच्या शेतातातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत कांतीलाल पंडित भिल यांनी पारोळा पोलिसात खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The youth's death in the well in Wadgaon, after the death of the youth