२५ मिनीटानंतरही उपचार न मिळाल्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 18:08 IST2017-08-16T18:06:31+5:302017-08-16T18:08:24+5:30
पहूर रुग्णालयात डॉक्टरांअभावी महेश शेजूळ या तरुणाचा दुदैवी मृत्यू

२५ मिनीटानंतरही उपचार न मिळाल्याने युवकाचा मृत्यू
आॅनलाईन लोकमत
पहूर, ता.जामनेर, दि.१६ - पहूर पेठमधील रहिवासी महेश शेजूळ (वय-१८) या तरुणाला विजेचा धक्का बसला.पहूर प्राथमिक रुग्णालयात तब्बल २५ मिनीटे उपचार न मिळाल्याने तरुणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.
महेश शेजूळ हा तरुण मंगळवारी गोठ्यात गुरांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद भरण्यासाठी गेला. या दरम्यान विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला विजय पांढरे यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टर नसल्याने तब्बल २५ मिनिटे या रुग्णांवर उपचार झाले नाही. त्यानंतर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलविण्यात आली. मात्र त्यातही डॉक्टर नसल्याने रुग्ण उपचारासाठी विव्हळत होता. या घटनेनंतर मयताच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला. मयत महेश शेजूळ याच्या पश्चात आई-वडिल, भाऊ असा परिवार आहे.