शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील इसमाने खानापूर शिवारात निंबाच्या झाडावर घेतला तरुणाचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:01 PM

रावेर तालुक्यातील खानापूर शिवारातील जुन्या चोरवड शिवार रस्त्यालगत निंबाच्या झाडाला गळफास घेऊन विजय मधुकर बागुल (वय ४२, रा.मोहाडी, ता.जामनेर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली.

ठळक मुद्दे खानापूर शिवारातील घटना डॉक्टरांनी मेडिकल स्टोअर्सच्या पॅडवर दिलेल्या प्रिस्क्रीप्शनवरून पटली ओळख

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील खानापूर शिवारातील जुन्या चोरवड शिवार रस्त्यालगत निंबाच्या झाडाला गळफास घेऊन विजय मधुकर बागुल (वय ४२, रा.मोहाडी, ता.जामनेर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली.बोंडे मळपट्टीतील माजी सरपंच गोवर्धन बोंडे यांच्या केळीबागेच्या बांधावरील पडविहिरीलगतच्या निंबाच्या झाडावर खंडित वीज संयोजनाच्या लटकलेल्या जुन्या टणक ताराला गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला.प्रगत शेतकरी गोवर्धन बोंडे यांचे दिवाणजी ओंकार गोविंदा धांडे यांना हा प्रकार सकाळी उघडकीस आला. त्यामुळे त्यांनी रावेर पोलिसांना ही माहिती दिली. दरम्यान, पो.हे.कॉ. बिजू जावरे व पो.कॉ. नीलेश चौधरी यांनी मयताचा घटनास्थळी पंचनामा केला. मयताच्या खिशात एका डॉक्टरने दिलेल्या औषधीच्या प्रिस्क्रीप्शनवर रोटवद, ता.जामनेर येथील राम मेडिकल स्टोअसचा दूरध्वनी क्रमांक आढळून आल्याने मयताची ओळख पटण्यास मदत झाली.संबंधित डॉक्टर व मेडिकल स्टोअर्सच्या समन्वयातून या मयताची ओळख पटली. जामनेर येथील जीएम फाऊंडेशनमधील आरोग्य सेवेत सेवारत असलेले रोटवद येथील उमेश बागूल यांचे ते थोरले बंधू होत. दोन वर्षांपूर्वी मयताच्या पत्नीचे अकाली निधन झाल्याने व तद्नंतर एका भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या मयताच्या मेंदूवर मोठी शस्त्रक्रिया झाल्यापासून काहींशी मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने हा प्रकार घडला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बिजू जावरे व पोकॉ नीलेश चौधरी तपास करीत आहेत. मयताच्या पश्चात पाच ते सहा वर्षांचा मुलगा असल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.विवरे बुद्रूक मतदान केंद्रावरील बंदोबस्तावरून मयताचे चुलत भाऊ आले धावूनमोहाडी येथील मयताचे सख्खे चुलतभाऊ असलेले पोकॉ हितेश बागूल यांची तालुक्यातील विवरे बुद्रूक येथील मतदान केंद्रावर बंदोबस्तात तैनात असलेले पो.कॉ. हितेश बागूल यांच्याकडे मयताचा गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंबंधीचा फोटो व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल झाल्याने त्यांना धक्काच बसला होता. सदर मयताचा फोटो व रावेर ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात त्यांनी प्रत्यक्ष मृतदेह पाहून त्यांना मृतदेहाची ओळख पटली.एवढ्या जामनेरच्या लांब अंतरावरून रावेर तालुक्यातील खानापूर शिवारात हा कसा काय पोहचला? असाच अनुत्तरीत प्रश्न त्यांच्या आप्तेष्टांमधून व्यक्त होत होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे ‘जी एम फाऊंडेशन’ या आरोग्य सेवेत वाहून घेतलेल्या उमेश बागूल यांचे ते थोरले बंधू आहेत. भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने मेंदूवर मोठी यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ५ ते ६ वर्षांचा कोवळा मुलगा मातृछत्रापाठोपाठ आता पितृछत्रही हरवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याRaverरावेर