वीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 20:53 IST2019-09-17T20:52:58+5:302019-09-17T20:53:03+5:30
अमळनेर : येथील शांतिभाईनगर परिसरात विद्युत तारा लोंबकळलेल्या वीजतारेचा स्पर्श होऊन शॉक लागून तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना ...

वीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी
अमळनेर : येथील शांतिभाईनगर परिसरात विद्युत तारा लोंबकळलेल्या वीजतारेचा स्पर्श होऊन शॉक लागून तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना १७ रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली.
या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून विद्युततारा लोंबकळत असल्याबाबत नागरिकांनी विद्युत मंडळाला अनेक वेळा तक्रार दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या परिसरात अतिदाबाचा विद्युत प्रवाह झाल्याने २० ते ३० मीटर बॉक्स व संसार उपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे. दरम्यान दिनेश परशुराम भिल (वय २०) हा तरुण घराच्या पत्र्यावरून लाकडेकाढत असताना लोंबकळलेल्या वीजतारांना स्पर्श झाल्याने शॉक लागून फेकला गेला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने दिनेश याला अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ.प्रकाश ताळे यांनी तपासले असता प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.
विद्युत पारेषण मंडळाने पावसाळ्यापूर्वी शहरासह तालुक्यातील लोंबकळलेल्या तारा, वाहतुकीला अळथळे ठरणारे खांब याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.