दाणाबाजारात तरुणाला लुटले, दहा हजारांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:17 IST2020-12-31T04:17:03+5:302020-12-31T04:17:03+5:30

जळगाव : दाणाबाजारात एका दुकानासमोर तरुणाला चाकूचा धाक दाखवून खिश्यातील १० हजार रुपये काढून घेत शिवीगाळ व ...

The youth was robbed in the grain market, ten thousand rupees in cash | दाणाबाजारात तरुणाला लुटले, दहा हजारांची रोकड लंपास

दाणाबाजारात तरुणाला लुटले, दहा हजारांची रोकड लंपास

जळगाव : दाणाबाजारात एका दुकानासमोर तरुणाला चाकूचा धाक दाखवून खिश्यातील १० हजार रुपये काढून घेत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना मंगळवारी, दि. २९ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील दाणाबाजार परिसरात एका दुकानावर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता तौकीर शेख रउफ शेख (वय-२१, रा. मास्टर कॉलनी) हा बसलेला होता. त्यावेळी रईस लाला (रा. मास्टर कॉलनी) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्ती दुकानासमोर आले. रईस लालाने तौकीर याला बोलावून घेतले. यानंतर शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने पोटाला चाकू लावला आणि खिशातील दहा हजार रुपये काढुन घेतले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देऊन दुचाकीने पळून गेले. तौकीर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रईस लाला आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.

Web Title: The youth was robbed in the grain market, ten thousand rupees in cash