विचखेडे येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:47+5:302021-06-16T04:22:47+5:30

या संदर्भात मयताचा भाऊ दिलीप शिवाजी भिल यांनी पोलिसांनी खबर दिली की १२ रोजी रात्री ...

A youth from Vichkhede drowned | विचखेडे येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

विचखेडे येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

या संदर्भात मयताचा भाऊ दिलीप शिवाजी भिल यांनी पोलिसांनी खबर दिली की १२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मी व माझा भाऊ गणेश शिवाजी भिल व आईवडील असे घरी जेवण केल्यानंतर बसलो होताे. यावेळी भाऊ गणेश शिवाजी भिल हा मला म्हणाला की मी बाहेर जाऊन येतो असे सांगून तो बाहेर गेला. तो दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील धरणाच्या पाण्यात मृत अवस्थेत आढळला. गावातील लोकांच्या मदतीने त्यास बाहेर काढले व पारडा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दीपक वाघ करीत आहेत.

फोटो १५सीडीजे ४

Web Title: A youth from Vichkhede drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.