आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१८ : उटखेडा, ता.रावेर येथील प्रभाकर उर्फ पंढरी प्रकाश बोरनारे (वय ३८ ह.मु.तुकारामवाडी, जळगाव) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजता घडली. कौटुंबिक छळातून बोरनारे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद आहे.प्रभाकर बोरनारे रोजगाराच्या निमित्ताने जळगावात आले होते. भजे गल्लीतील एका सलून दुकानावर कामाला होते. तुकारामवाडी भाड्याचे घर घेऊन पती व मुलांसह राहत होते. त्यांच्याच शेजारी सासरची मंडळीही राहत होते. शालक व बोरनारे यांच्यात पैशावरुन नेहमीच वाद असल्याने त्याच छळातून बोरनारे यांनी आत्महत्या केली असा आरोप बोरनारे यांच्या भावांनी जिल्हा रुग्णालयात केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी पंचनामा करुन शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. जीवन धनराज बोरनारे यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उटखेडा येथील तरुणाची जळगावात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 17:25 IST
जळगाव,दि.१८ : उटखेडा, ता.रावेर येथील प्रभाकर उर्फ पंढरी प्रकाश बोरनारे (वय ३८ ह.मु.तुकारामवाडी, जळगाव) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजता घडली.
उटखेडा येथील तरुणाची जळगावात आत्महत्या
ठळक मुद्देतुकारामवाडीतील राहत्या घरात केली आत्महत्या.मयत व त्यांच्या शालकामध्ये पैशांवरून वाद असल्याचा नातेवाईकांचा आरोपकौटुंबिक छळातून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप