भुसावळच्या लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: June 17, 2017 17:22 IST2017-06-17T17:22:42+5:302017-06-17T17:22:42+5:30
निंबारी, ता़मलकापूर येथील शुभम नेमाडे हे शहरातील लॉजमध्ये मुक्कामास होत़े

भुसावळच्या लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या
ऑनलाईन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 17 - मलकापूर तालुक्यातील निंबारी येथील शुभम रामदास नेमाडे (वय 25) इसमाने भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील एका लॉजमध्ये विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली़ 16 ते 17 जून दरम्यान ही घटना घडली़ या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़
निंबारी, ता़मलकापूर येथील शुभम नेमाडे हे शहरातील लॉजमध्ये मुक्कामास होत़े त्यांनी 16 रोजी सायंकाळपासून ते 17 रोजी सकाळच्या 11 वाजेदरम्यान काहीतरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली़ लॉजचे व्यवस्थापक रायचंद पालोदे यांनी बाजारपेठ पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़