युवकांना गुन्हेगारीपासून परावृत्त करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:19+5:302021-09-07T04:21:19+5:30
रावेर : शहराला चांगला ऐतिहासिक वारसा असताना राज्यस्तरीय कायदा - सुव्यवस्था संदर्भात गृहविभागाच्या बैठकीत रावेरचा उल्लेख अग्रक्रमाने होत असल्याची ...

युवकांना गुन्हेगारीपासून परावृत्त करावे
रावेर : शहराला चांगला ऐतिहासिक वारसा असताना राज्यस्तरीय कायदा - सुव्यवस्था संदर्भात गृहविभागाच्या बैठकीत रावेरचा उल्लेख अग्रक्रमाने होत असल्याची शोकांतिका आहे. तरी पालकांनी युवकांसमोर भविष्याचे स्वप्न ठेवून गुन्हेगारीपासून परावृत्त करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी येथे केले.
रावेर पोलिस स्टेशनमध्ये गणेशोत्सवानिमित्त आयोजित शांतता समितीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी रावेर शहराच्या जातीय सलोख्याबाबत खंत व्यक्त केली. दरम्यान, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, रसलपूर येथील मुस्लिम पंच कमिटीचे अय्युबखां, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, कामगार नेते दिलीप कांबळे, शिवसेना तालुका संघटक अशोक शिंदे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष दारा मोहंमद यांनी शहरातील राजकारण सौहार्दपूर्ण असले तरी रिकामटेकड्या युवकांमुळे शांतता बिघडवली जात असल्याने कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली.
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्रभारी तहसीलदार महेश पवार, नगरसेवक आसिफ मोहम्मद, माजी नगरसेवक ॲड. योगेश गजरे, माजी नगरसेवक सुधाकर महाजन, उमेश महाजन, राकाँ अनु. जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज वाघ, संतोष पाटील, नगरसेवक शेख सादिक, शैलेंद्र अग्रवाल, राकाँ तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी, इ. जे. महाजन, नितीन पाटील, गिरीश पाटील, नीलेश पाटील, भारिप बहुजन महासंघाचे बाळू शिरतुरे, राकाँ शहराध्यक्ष शेख महमूद, प्रदीप सपकाळे, माजी नगरसेवक गोपाळ बिरपन, नगरसेवक असदुल्ला खान, काँग्रेसचे अनु .जाती सेलचे तालूकाध्यक्ष सावन मेढे, धुमा तायडे, हिलाल सोनवणे, युसूफ खान आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी केले तर आभार पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड यांनी मानले.