तरुणाचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:02 IST2019-06-27T21:01:40+5:302019-06-27T21:02:21+5:30
भडगाव येथील घटना

तरुणाचा शॉक लागून मृत्यू
भडगाव - शहरातील यशवंत नगरवरच्या बर्डी भागातील रहिवाशी विशाल यशवंत कोळी (वय १८) या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना २७ रोजी दुपारी ३ वाजता घडली. विशाल हा इलेक्ट्रीक मोटार लावून पाणी भरत असतांना मोटारीचा शॉक लागून घराच्या बाहेर फेकला गेला. त्यास औषधोपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले . या घटनेचा तपास पोलीस नाईक हिरालाल पाटील करीत आहे. या घटनेने या भागात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला मयताचे वडील यशवंत कोळी यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे .