तोंडापूर, ता.जामनेर, जि.जळगाव : येथून जवळ असलेल्या वडाळी येथे ‘गाव माझं तर स्वच्छ मीच ठेवणार’ ही संकल्पना वापरून युवकांनी गावात स्वच्छता अभियान राबविले. यासाठी शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.वडाळी गावातील गटारी तुंबल्या होत्या. गावातील अंगणवाडी शेजारीही घाण जमा झाली होती. घाणीमुळे लहान मुलांना साथीच्या आजारांनी पछाडले आहे. घाणीमुळे दुर्गंधी पसरलेली दिसते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च तुंबलेल्या गटारी काढण्याचे काम केले.सागर आवटे, कौतिक आवटे, ज्ञानेश्वर सावळे, सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी गावातील अंगणवाडी शेजारची घाण साफ केली.गजानन बनकर, आकाश आवटे, ऋषिकेश पाटील, राहुल वडाळे, विजयराज खेंते, विशाल पवार, बबलू गोसावी, सुरेश दळवी, भारत भालेराव, अलकेश जाधव, नितीन पाटील, सुनील पाटील, राहुल शिनगारे, इंसान तडवी, अरुण सटाले, सोनू मोरे, समाधान आवटे, सोनाली पवार, पूजा वडाळे, पूजा वाघ आदी कार्यकर्त्यांनी गावात स्वच्छता मोहीम राबविली.
वडाळी येथे युवकांकडून स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 18:39 IST
वडाळी येथे ‘गाव माझं तर स्वच्छ मीच ठेवणार’ ही संकल्पना वापरून युवकांनी गावात स्वच्छता अभियान राबविले.
वडाळी येथे युवकांकडून स्वच्छता मोहीम
ठळक मुद्देकार्यकर्त्यांनी केली साफसफाईकाढल्या गावातील गटारी