पारोळ्याजवळ ट्रकच्या धडकेत तरूण ठार

By Admin | Updated: July 4, 2017 12:35 IST2017-07-04T12:35:39+5:302017-07-04T12:35:39+5:30

अपघातात एक जण जखमी. ट्रकचालक घटनास्थळावरून पसार

Youth killed in the truck's track near Parola | पारोळ्याजवळ ट्रकच्या धडकेत तरूण ठार

पारोळ्याजवळ ट्रकच्या धडकेत तरूण ठार

ऑनलाईन लोकमत

पारोळा,दि.4 - अज्ञात  ट्रकने कारला धडक दिल्याने भूषण शालिग्राम पाटील (रा.वर्धमान नगर, पारोळा) हे जागीच ठार झाले. तर एकजण जखमी झाला. हा अपघात मध्यरात्री म्हसवे शिवारातील दुर्गा पेट्रोलपंपाजवळ झाला.
भूषण शालिग्राम पाटील (रा.लोण,ता.अमळनेर, ह.मु.वर्धमान नगर,पारोळा) हे आपल्या चारचाकीने  (एमएच 19-एपी4592) एरंडोलकडून पारोळ्याकडे येत होते. म्हसवे शिवारात दुर्गा पेट्रोल पंपाजवळ अज्ञात ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, कारची दिशा बदलून गेली. त्यामुळे मागून येणा:या ट्रकवर (एमएच 04-सीजी 4496) आदळली. त्यामुळे भूषण पाटील याचा जागीच मृत्यू झाला.तर एकजण जखमी झाला. धडक देणारा ट्रक चालक वाहनासह फरार झाला. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Youth killed in the truck's track near Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.