दहिवद खुर्द येथून युवकाचे फूस लावून अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:40 IST2019-09-10T23:40:53+5:302019-09-10T23:40:58+5:30
अमळनेर : तालुक्यातील दहिवद खुर्द येथून एका युवकाचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची घटना २६ आॅगस्ट रोजी घडली ...

दहिवद खुर्द येथून युवकाचे फूस लावून अपहरण
अमळनेर : तालुक्यातील दहिवद खुर्द येथून एका युवकाचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची घटना २६ आॅगस्ट रोजी घडली होती. १० सप्टेंबर रोजी याबाबत तक्रार दिल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहिवद खुर्द येथील हिरालाल पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या हरजा शंकर सोळंकी यांचा १७ वर्षाच्या मुलगा दारासिंग याने २६ रोजी सायंकाळी वडिलांना मी दहिवद येथून कटिंग करून येतो, असे सांगितले व तो निघून गेला तो अद्याप परत आला नाही.
मुलाची शोधाशोध केली असता तो आढळून आला नाही अखेर हरजा यांना मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने मुलाला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.