लग्नाच्या वाढदिवसाला युवा शेतकर्याने संपविली जीवनयात्रा
By Admin | Updated: May 14, 2014 00:50 IST2014-05-14T00:50:32+5:302014-05-14T00:50:32+5:30
पंचवीस वर्षीय शेतकर्याने गारपीटमुळे स्वप्न भंग झाल्यामुळे लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना निंभोरा ता.धरणगाव येथे घडली.

लग्नाच्या वाढदिवसाला युवा शेतकर्याने संपविली जीवनयात्रा
धरणगाव : शेती पिकातून उत्पन्न काढून संसार फुलविण्याचे स्वप्न पाहणार्या पंचवीस वर्षीय शेतकर्याने गारपीटमुळे स्वप्न भंग झाल्यामुळे लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना निंभोरा ता.धरणगाव येथे घडली. सुनील बन्सीलाल कोळी (वय-२५) हे ७/८ बिघे शेतीवर कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. गेल्या वर्षी १२ मे २०१३ ला त्याचे लग्न झाले होते. गावातील विकास सोसायटीचे थकलेले अडीच लाख कर्ज व खाजगी कर्ज रब्बी हंगामाच्या हाती आलेल्या उत्पन्नातून फेडू व संसार फुलवू असे स्वप्न सुनिल कोळी हा पाहत असताना निसर्गाच्या झटक्याने तोंडी आलेला घास हिरावल्याने त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. त्यातून दि.१२ मे रोजी संध्या. ७.३० वाजता राहत्या घरी सुनील कोळी याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्त्या केली. गावात या घटनेबाबत माहिती कळताच एकच गर्दी झाली होती.