शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांंना फोन करीत युवकाने केली आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 21:53 IST

नांदुपिंप्री येथील पुलावरुन तापी नदीत घेतली उडी ; रावेर येथे शोककळा 

रावेर : शहरातील श्री हनुमान वाड्यातील रहिवासी व एका आरोग्य विमा कंपनीतच सेवारत असलेल्या २८ वर्षीय अविवाहित युवकाने आतेभावाला भ्रमणध्वनीवरून कळवत निंभोरासीम ते नांदुपिंप्री दरम्यान असलेल्या पुलावरून तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना ३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शहरातील युवावर्गात  शोककळा पसरली आहे. 
   याबाबत रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील हनुमान वाड्यातील रहिवासी असलेला दिपक प्रकाश माळी (वय २८) हा बीकॉम पदवीधर युवक एका आरोग्य विमा कंपनीत सेवारत होता. दरम्यान, आपले दैनंदिन कामकाज आटोपून गुरूवारी सायंकाळी घरी येवून बाहेर गेला असता त्याने वडीलांना भ्रमणध्वनीवरून फोन करत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. 
  दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा त्याने त्याचा आतेभाऊ मनोज महाजन यांना भ्रमणध्वनीवरून तापी नदीच्या पुलावर मोटारसायकल, बॅग व मोबाईल ठेवला असून तापी नदी पात्रात उडी मारून आत्महत्या करीत असल्याचे कळवले व लगेच उडी मारली. रात्री उशिरापर्यंत धुरखेडा येथील मच्छीमारी व्यावसायिकांनी शोध मोहीम राबवली. मात्र ती विफल ठरली.   शुक्रवारी सकाळी धुरखेडा येथील ज्ञानेश्वर बेलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा मृतदेह तापीनदीच्या खोल पात्रातून बाहेर काढला. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले. शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  कोरोनाच्या लॉकडाउनपुर्वी जळगावला एका बँकेत असलेली सेवा संपुष्टात आल्यापासून बेरोजगारीच्या मानसिक तणावात तो होता. 
पश्चात आई वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. या घटनेबाबत  रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जून सोनवणे पुढील तपास करीत आहेत.