Youth commits suicide in Varangaon factory | वरणगाव फॅक्टरीत युवकाची आत्महत्या

वरणगाव फॅक्टरीत युवकाची आत्महत्या

दीपनगर/ वरणगाव, ता. भुसावळ : वरणगाव फॅक्टरी येथील आयुध निर्माणी वसाहत मधील टाईप टू क्वार्टर नंबर २६ मधील रहीवासी अजय दिलीप मेटकर (वय २०) याने रहात्या घरात पंख्याला साडी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रोजी दुपाच्या सुमारास घडली. याबाबत वरणगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की , अजय मेटकर याची आई वरणगाव फॅक्टरीत नोकरीस असून तो मुक्ताईनगर येथील आयटीआयमध्ये शिकत होता . दुपारच्या सुमारास आई ड्युटीवर गेली असताना त्याने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याची आई सायंकाळी घरी आल्यावर सदर घटना उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेद करण्यात आले. वरणगांव पोलीस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नरसिंग चव्हाण , अतुल बोदडे करीत आहे .या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Youth commits suicide in Varangaon factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.