युवा पुरस्कार तीन वर्षांपासून प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:04+5:302021-07-28T04:17:04+5:30
जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार ...

युवा पुरस्कार तीन वर्षांपासून प्रलंबित
जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार प्रलंबित आहेत. विविध गटातील हे पुरस्कार लवकरात लवकर देण्याची मागणी जिंदगी फाऊंडेशनने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना नुकतेच निवेदनदेखील देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, युवक, युवती आणि सामाजिक संस्था अशा तीन श्रेणींमध्ये दरवर्षी तीन पुरस्कार दिले जातात. त्यामुळे तीन वर्षांचे एकूण नऊ पुरस्कार प्रलंबित आहेत.
गेल्या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया लवकर घेवून हे पुरस्कार जाहीर करण्यात यावे, अशी मागणी जिंदगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव यांनी केली आहे.