तरुणांचा एकमेकांवर हल्ला
By Admin | Updated: January 1, 2016 00:15 IST2016-01-01T00:15:40+5:302016-01-01T00:15:40+5:30
क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादातून दोन गटातील तरुणांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला.

तरुणांचा एकमेकांवर हल्ला
धुळे : क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादातून दोन गटातील तरुणांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना 30 डिसेंबरला रात्री 10.30 वाजेच्या सुमारास साक्री शहरातील सिडी शॉपसमोर घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीनुसार एकूण पाच जणांवर साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मध्यरात्रीनंतर दोन संशयितांना अटक केली आहे. या घटनेबाबत पहिली फिर्याद अतुल सुकदेव जाधव (31, रा.रामजीनगर, साक्री) याने दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी साजीद अहमद तांबोळी, इम्रान अहमद तांबोळी व अन्य एक जण (नाव, गाव माहिती नाही) (रा.वंजारगल्ली, साक्री) यांनी फिर्यादी अतुल जाधव याला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. मारहाणीत साजीद तांबोळी याने अतुल जाधवच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. म्हणून त्याला गंभीर दुखापत झाली. कोल्ड्रिंक मागण्याच्या कारणावरून हा वाद उद्भवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून वरील संशयितांवर साक्री पोलीस ठाण्यात भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी मध्यरात्रीनंतर 1.15 वाजता संशयित साजीद तांबोळी व इम्रान तांबोळी या दोघांना अटक केली. दुस:या गटाकडूनही फिर्याद याच घटनेप्रकरणी दुस:या गटाकडून साजीद अहमद तांबोळी (31, रा.वंजारगल्ली, साक्री) याने फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी अतुल सुकदेव जाधव (रा.रामजीनगर, साक्री), संदीप सीताराम मासुळे (रा.वंजारगल्ली, साक्री) या दोघांनी फिर्यादी साजीद तांबोळी व त्याचा भाऊ इम्रान तांबोळी याला शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. साजीद तांबोळी हा दुकानासमोर उभा असताना दोघेही संशयित त्याच्याजवळ आले. त्यांनी दारूची बाटली फोडून त्याला घरी जाण्यास सांगितले. त्यावर साजीदने काय झाले? अशी विचारणा केली. या गोष्टीचा राग आल्याने अतुल जाधवने साजीदला मारण्यासाठी बाक उचलला. बाक डोक्याला लागल्याने त्याला दुखापत झाली. तर संदीप मासुळे याने इम्रान तांबोळीला दगड मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून वरील दोघांवर भादंवि कलम 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एच.एस. बैरागी करीत आहेत.