शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत नोकरीला लावण्यासाठी तरुणीला सात लाखात गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 19:55 IST

वडील रेल्वेत टी.सी.असून त्यांच्या ओळखीच्या माध्यमातून रेल्वेत नोकरीला लावून देण्यासाठी तरुणाने तरुणीला सात लाख रुपयात गंडविल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आकाश मनोहर पाटील व त्याचे वडील मनोहर वामन पाटील (रा.वडगाव,ता.रावेर) या दोघांविरुध्द बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल तक्रार केली तर आत्महत्येची धमकी

जळगाव : वडील रेल्वेत टी.सी.असून त्यांच्या ओळखीच्या माध्यमातून रेल्वेत नोकरीला लावून देण्यासाठी तरुणाने तरुणीला सात लाख रुपयात गंडविल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आकाश मनोहर पाटील व त्याचे वडील मनोहर वामन पाटील (रा.वडगाव,ता.रावेर) या दोघांविरुध्द बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.योगीता ऋषीकेश खैरनार (रा.सम्राट कॉलनी, जळगाव) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुार, मुलगी वर्षा ही कला शाखेची पदवीधर असून दुसरी मुलगी श्वेता हिचा मित्र आकाश मनोहर पाटील याचे घरी येणे-जाणे होते. त्यामुळे परिवारात चांगले संबंध होते. वर्षा ही नोकरीच्या शोधात असल्याचे पाहून आकाश याने तुझ्या बहिणीला रेल्वेत नोकरीला लावून देतो. माझे वडील भुसावळ विभागात रेल्वेत टी.सी.आहेत असे सांगून नोकरीच्या अर्ज दाखल करण्यासाठी १० हजार रुपये भरावे लागतील असे सांगून आकाश याने श्वेता हिच्याकडून ही रक्कम घेतली. त्यानंतर परत १५ दिवसांनी ५० हजार रुपये लागतील म्हणून तो घरी आला. तेव्हा त्याला ही रक्कम देण्यात आली. त्यानंतर काही ना काही कारण सांगून आॅनलाईन पध्दतीने दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये आकाश याने वर्षा हिच्या नावाचे नोकरीवर रुजू होण्याचे बनावट पत्र आणले.दरम्यान, रुजू होण्याच्या आधीच त्या कार्यालयात कोणीतरी फोन करुन उलटसुलट माहिती सांगितल्याचे कारण सांगून त्यासाठी परत ९० हजार रुपये घेतले. ही रक्कम घेण्यासाठी त्याचे वडील मनोहर वामन पाटील हे देखील होते. तेव्हा त्यांनी तुम्ही पूर्ण रक्कम दिली तरच तुमच्या मुलीचे नोकरीचे काम होईल असे आमिष दाखविले व त्यानंतर वेळोवेळी सात लाख रुपये पिता-पूत्रांनी घेतले.तगादा लावल्यावर लग्नाचे आमिषइतकी रक्कम दिल्यानंतर नोकरी लागत नसल्याने श्वेताची आई योगीता यांनी तगादा लावला असता अरुण शिंदे हे रेल्वेत मॅनेजमेंट विभागात नोकरीला आहेत, त्यांच्याशी बोलून मी तुमचे काम करतो असे सांगून वेळ मारुन नेली. त्यानंतर श्वेता हिच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव ठेवून तसे आमिष दाखविले व लग्नासाठी देखील पैशांची मागणी केली. मुलीला नोकरी लागत नसल्याने योगीता खैरनार यांनी पैसे परत मागितले असता आकाश याने तुम्ही मला पैसे मागितले तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करुन घेईल, असा दम भरला. त्यामुळे योगीता खैरनार यांनी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरुन पिता-पुत्राविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील व योगेश बारी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव