युवकांनी उद्योग -व्यवसायाकडे वळावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:32+5:302021-09-04T04:20:32+5:30
चुंचाळे /यावल : मराठा समाज हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज असून तरुणांनी उद्योग- व्यवसायाकडे वळावे, असे ...

युवकांनी उद्योग -व्यवसायाकडे वळावे !
चुंचाळे /यावल : मराठा समाज हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज असून तरुणांनी उद्योग- व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राम पवार यांनी यावल येथे केले.
मराठा सेवा संघ वर्धापन दिनी गुरुवारी यावल येथे बाजार समितीच्या सभागृहात अध्यक्षस्थानावरुन पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यावलचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील , माजी उपानगराध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष विजय पाटील (किनगाव), मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अजय पाटील, नूतन मराठा महाविलय जळगाव येथील डॉ. हेमंत येवले, महावितरणचे उपकार्यकरी अभियंता दिलीप मराठे, यावल पंचायत समितीचे बी.डी.ओ डॉ. नीलेश पाटील, दहीगावचे माजी सरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देवीदास धागो पाटील उपस्थित होते.
यावेळी दीपक गोकुळ पाटील याने यावल किसान प्रोड्युसर कंपनी स्थापनेत पुढाकार घेऊन तरुणांना रोजगार आणि शेतकऱ्यांना उपन्न वाढीसाठी एक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राम पवार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला
आभार एन. पी. चव्हाण यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष देवकांत पाटील, मराठा सेवा संघ तालुका सचिव संतोष पाटील, सुनील गावडे, बाजार समितीचे कर्मचारी किशोर सोनवणे, शेतकी संघाचे संजय भोईटे, यशवंत जासूद, गुलाब पाटील, भागवत पाटील, नीलेश पाटील, भूषण पाटील आदी उपस्थित होते.