तरुणाचा मोबाइल लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:17 IST2021-04-01T04:17:03+5:302021-04-01T04:17:03+5:30

जळगाव : पंचमुखी हनुमान मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर अज्ञात तिघांनी दुचाकीवर येऊन पायी जाणाऱ्या मयूर गणेश वडनेरे (वय, २५ रा. ...

The young man's mobile lengthened | तरुणाचा मोबाइल लांबविला

तरुणाचा मोबाइल लांबविला

जळगाव : पंचमुखी हनुमान मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर अज्ञात तिघांनी दुचाकीवर येऊन पायी जाणाऱ्या मयूर गणेश वडनेरे (वय, २५ रा. रामेश्वर कॉलनी) या

तरुणाच्या पॅन्टच्या खिश्यातून ११ हजार रुपये किंमतीचा मोबाइल जबरी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर गणेश वडनेरे हा तरुण कामाच्या निमित्ताने पांडे डेअरी चौकाकडून सिंधी कॉलनीकडे जात असतांना मागून भरधाव वेगाने दुचाकीवरून येणाऱ्या अज्ञात तिघांनी मयूरच्या पॅन्टच्या खिश्यातील ११ हजार रुपये किमतीचा मोबाइल जबरी हिसकावून घेतला. आरडाओरड केली असता तिघे दुचाकीवरून पसार झाले होते. याप्रकरणी मयूर वडनेरे याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विशाल वाठोरे करीत आहे.

Web Title: The young man's mobile lengthened