अपघातानंतरही कुणी मदतीला न धावल्याने अर्धा तास विरहळला तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST2021-05-08T04:17:13+5:302021-05-08T04:17:13+5:30
कोर्ट चौकातील घटना : अखेर शिव सैनिकाने दखल केले रुग्णालयात जळगाव : कोरोनाने माणसांची माणुसकीही हिरावली असून, गुरुवारी रात्री ...

अपघातानंतरही कुणी मदतीला न धावल्याने अर्धा तास विरहळला तरुण
कोर्ट चौकातील घटना : अखेर शिव सैनिकाने दखल केले रुग्णालयात
जळगाव : कोरोनाने माणसांची माणुसकीही हिरावली असून, गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास कोर्ट चौकात एका तरुणाची दुचाकी घसरून, तरुणाला मोठी दुखापत झाली. यावेळी तरुण मोठमोठ्या विहळत असतांनाही जाणाऱ्या वाहन धारकांनी फक्त बघ्याची भूमिका घेत एकही व्यक्ती मदतीला धावला नाही. अखेर याच रस्त्याने बळीराम पेठेकडे जाणाऱ्या शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने या तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करून माणूसकीचे दर्शन घडविले.
शिवसेनेच्या बळीराम पेठ शाखेचे कार्यकर्ते जितेंद्र गवळी हे जिल्हा रुग्णालयात एका कोरोना बाधित नागरीकाला दाखल करून घराकडे परतत होते. यावेळी त्यांना कोर्ट चौकात रस्त्याच्या कडेला एका तरुणाच्या दुचाकीचा अपघात झाल्याने, तो रक्तबंबाळ अवस्थेत मोठमोठ्या विहळत होता. तर गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडलेली होती. यावेळी जितेंद्र गवळी यांनी त्या अपघात ग्रस्त तरूणाला आपल्या लहान भावाच्या मदतीने उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.