घरातून निघताच दहा मिनिटात तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:17 IST2021-07-29T04:17:03+5:302021-07-29T04:17:03+5:30
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर मोरे व गोविंदा सोनवणे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय गोदामात हमाल म्हणून काम करायचे. याच ठिकाणी ...

घरातून निघताच दहा मिनिटात तरुण ठार
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर मोरे व गोविंदा सोनवणे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय गोदामात हमाल म्हणून काम करायचे. याच ठिकाणी कामाला असलेला त्यांचा मित्र युवराज बोरसे यांच्या मुलीचे बुधवारी यावल तालुक्यातील अट्रावल येथे लग्न होते. या लग्नासाठी सागर व गोविंदा हे सकाळी साडे दहा वाजता दुचाकीने (एमएच १९ बीपी ७४१३) घरातून निघाले. ममुराबाद सोडल्यावर अट्रावलकडे जात असताना विदगावच्यापुढे मालवाहू वाहनाने (एमएच १९ बीएम ५०९६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सागर मोरे जागीच ठार झाला, तर गोविंदा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच ममुराबादच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेने सागर व गोविंदा या दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सागर याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी गोविंदा याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. डोक्याला जबर मार लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन सागरचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर मालवाहू वाहनांवरील चालक पसार झाला होता. सागर याच्या पश्चात आई सिंधु, वडील राधेशाम, पत्नी पूजा, मुलगा राघव (वय ७) मुलगी उज्ज्वला (वय ४ ) असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.