ट्रॅक्टरखाली दाबला जाऊन तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:48+5:302020-12-04T04:46:48+5:30
एका ट्रॅक्टरमालकाचे ट्रॅक्टर घेऊन सचिन सुरसे हा रात्री शेतीकामासाठी गेला होता. शेतातील काम आटोपून तो रात्री एक वाजेच्या सुमारास ...

ट्रॅक्टरखाली दाबला जाऊन तरुण जागीच ठार
एका ट्रॅक्टरमालकाचे ट्रॅक्टर घेऊन सचिन सुरसे हा रात्री शेतीकामासाठी गेला होता. शेतातील काम आटोपून तो रात्री एक वाजेच्या सुमारास गावाकडे येत होता. गावालगतच असलेल्या नाल्यात ट्रॅक्टर उलटले आणि त्याखाली दाबला जाऊन सचिन याचा करुण अंत झाला. गावातील रहिवासी राजू भोई हे वाहनाने एरंडोलकडून रिंगणगाव येत असताना त्यांना नाल्यात पडलेला ट्रॅक्टर आणि त्याची सुरू असलेले हेडलाइट दिसले. या घटनेची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. त्यांनी या तरुणाला बाहेर काढले.
सचिनचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी माहेरी गेली होती. घरातील कर्ता पुरुषच गेल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.