ट्रॅक्टरखाली दाबला जाऊन तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:01+5:302020-12-04T04:46:01+5:30
रिंगणगाव ता. एरंडोल : रात्री शेतातून परत येत असताना ट्रॅक्टर अचानक उलटले जाऊन त्याखाली दाबला गेल्याने सचिन श्रीराम ...

ट्रॅक्टरखाली दाबला जाऊन तरुण जागीच ठार
रिंगणगाव ता. एरंडोल : रात्री शेतातून परत येत असताना ट्रॅक्टर अचानक उलटले जाऊन त्याखाली दाबला गेल्याने सचिन श्रीराम सुरसे (३०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री १ वाजता घडली.
सचिन सुरसे हा रात्री शेतीकामासाठी ट्रॅक्टर घेऊन गेला होता. शेतातील काम आटोपून तो रात्री एक वाजेच्या सुमारास गावाकडे येत होता. गावालगतच असलेल्या नाल्यात ट्रॅक्टर उलटले आणि त्याखाली दाबला जाऊन सचिन याचा मृत्यू झाला. गावातील रहिवाशी राजू भोई हे वाहनाने एरंडोलकडून रिंगणगावकडे येत असताना त्यांना नाल्यात पडलेले ट्रॅक्टर दिसले. या घटनेची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. त्यांनी या तरुणाला बाहेर काढले. सचिनचे आठ महिन्यापूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी माहेरी गेली होती. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.