जळगावात अल्पवयीन मुलीची छेड काढणा-याला तरुणाला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:19 IST2017-11-28T16:12:50+5:302017-11-28T16:19:49+5:30
प्रभात चौकात बुलेटस्वार तरुणाने रस्त्याने जाणाºया तरुणींची छेड काढल्याचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारीही शाळेत जाणा-या अल्पवयीन मुलीचा सतत घरापासून पाठलाग करुन छेड काढण्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, कांचन नगरातील सतरा वर्षाच्या तरुणाला पीडित मुलीच्या नातेवाईकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी त्याला पोलीस ठाण्यातच प्रसाद देण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

जळगावात अल्पवयीन मुलीची छेड काढणा-याला तरुणाला पकडले
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२८ : प्रभात चौकात बुलेटस्वार तरुणाने रस्त्याने जाणाºया तरुणींची छेड काढल्याचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारीही शाळेत जाणाºया अल्पवयीन मुलीचा सतत घरापासून पाठलाग करुन छेड काढण्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, कांचन नगरातील सतरा वर्षाच्या तरुणाला पीडित मुलीच्या नातेवाईकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी त्याला पोलीस ठाण्यातच प्रसाद देण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
कांचन नगरात राहणारा हा तरुण नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत आहे. तो राहत असलेल्या परिसरातच ही पीडित तरु णी राहते. ती एका शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ही मुलगी घरातून बाहेर निघाल्यापासून तर शाळा सुटल्यानंतर सतत चार दिवसापासून तिचा पाठलाग करीत होता. मंगळवारी ही मुलगी सकाळी सात वाजता घरातून सायकलीने निघाल्यानंतर तो देखील तिच्या मागे दुचाकीने निघाला. पीडित मुलीने शाळेत वर्ग शिक्षकांकडे हकीकत कथन केली. या शिक्षकांनी तिच्या पालकांना फोन करुन शाळेत बोलावून घेतले. पोलिसांच्या मदतीने त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले.