शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आईची भेट घेवून येत असताना जळगावचा तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 13:23 IST

नशिराबादजवळ महामार्गावर अपघात

ठळक मुद्देव्हॉटस्अ‍ॅपवरुन पटली ओळखअयोध्यानगरात शोककळा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १० - भुसावळ येथे वास्तव्याला असलेल्या आईला भेटून घरी दुचाकीवर परत येत असलेल्या अरुण प्रभाकर महाजन (वय ३०, रा. अयोध्या नगर, जळगाव) याला रविवारी सायंकाळी राष्टÑीय महामार्गावर नशिराबादजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या अरुणचा सोमवारी दुपारी चार वाजता गोदावरी हॉस्पिटल व वैद्यकिय महाविद्यालय येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अरुण महाजन हा पत्नी कल्पना व पाच वर्षाचा मुलगा स्वामी यांच्यासह अयोध्या नगर येथे वास्तव्य आहे. आई नर्मदा भुसावळ येथे वास्तव्याला असल्याने रविवारी तो दुचाकीने (क्र.एम.एच. १९ ए. एफ . ५९६४) तिला भेटायला गेला होता. तेथून सायंकाळी परत येत असताना राष्टÑीय महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अरुण याला लोकांनी तातडीने गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली.केळीचे वेफर विक्रीचा व्यवसायअरुण व त्याची पत्नी अयोध्या नगरात केळीचे वेफर विक्रीचा व्यवसाय करायचे. वडील प्रभाकर महाजन यांचे निधन झाले आहे. भुसावळ येथे आई एकटीच राहते.अयोध्यानगरात शोककळाअरुणची पत्नी कल्पना व मुलगा स्वामी हे माहेरी यावल येथे गेले होते. त्यामुळे घरी कोणीच नव्हते. घरी कोणी नसल्याने अरुण उशिरापर्यंत घरी आला नाही याची कोणीच चौकशी केली नाही. सकाळी सात वाजता अरुणचा मोठा भाऊ गणेश यांना सकाळी व्हॉटस्अ‍ॅपवर अरुणचा जखमी अवस्थेतील फोटो व नुकसानग्रस्त दुचाकी दिसली. हा प्रकार पाहिल्यानंतर गणेश याने भाच्याला फोन करुन माहिती दिली. दोघांनी नंतर नशिराबाद पोलीस स्टेशन गाठले तेथून गोदावरी हॉस्पिटल गाठले. एक रात्र व अर्धा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे अयोध्यानगरात शोककळा पसरली.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव