तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:02 IST2020-06-13T22:00:27+5:302020-06-13T22:02:11+5:30

मंगळूर येथील घटना

Young man falls into a well and dies | तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू


पारोळा : तालुक्यातील मंगरूळ येथील ३२ वर्षीय तरुणाचा विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरल्याने पडून मृत्यू झाल्याची घटना नगाव शिवारातील शेतात घडली.
मंगरूळ ता.पारोळा येथील राहुल रमेश सोनवणे (वय ३२) हा शनिवारी सकाळी शेतात मजूर लावले असल्यामुळे शेतात गेला होता.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या स्वत:च्या शेतातील नगाव शिवारातील विहिरीवर मजुरांना पिण्यासाठी पाणी काढण्यात गेला असता पाय घसरून विहरीत पडला. ही विहीर ८० फुट खोल आहे. त्यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याला जागीच मृत्यू झाला.
याबाबत भरत सोनू पाटील यांनी माहिती दिली. पारोळा पोलिसात या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
राहुलच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Young man falls into a well and dies