शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नवीन विद्युत लाईनचे काम करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 18:43 IST

Young man dies of electric shock : नेरी रस्त्यावर जुन्या विद्युत वाहिनीच्या शेजारीच नवीन विद्युत लाईन उभारली जात आहे.

ठळक मुद्देवसंत घ्यार हे कामावर सुपरवायझर होते. दरम्यान,काम सुरु असताना मुख्य वाहिनीचा विज पुरवठा खंडीत करायला हवा होता, तो सुरु ठेवणेच तरुणाच्या जीवावर बेतल्याचा आरोप कामगारांनी केला.

जळगाव : नवीन विद्युत लाईनचे काम करीत असताना पोलचे ट्रॅक्टर पलटी होऊन उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून विशाल नुकूल गायकवाड (वय १८,रा.मोंढाळा, ता.भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता चिंचोली, ता.जळगाव शिवारात घडली.

नेरी रस्त्यावर जुन्या विद्युत वाहिनीच्या शेजारीच नवीन विद्युत लाईन उभारली जात आहे. चिंचोली शिवारात राधाकृष्ण लॉन्सजवळ हे काम सुरु आहे.या कामावर मोंढाळा, ता.भुसावळ येथील कामगार रोज कामाला येत आहेत. बुधवारी दुपारी मुख्य वाहिनीच्या शेजारीच ट्रॅक्टरच्या सहाय्याने पोल उभे केले जात होते, त्यावेळी ट्रॅक्टर पलटी झाल्याने पोलचा मुख्य वाहिनीच्या तारांना स्पर्श झाला. पोलला हातात धरलेल्या विशाल गायकवाड या जोरदार विजेचा धक्का बसला तर त्याच्याच शेजारी असलेले ईश्वर एकनाथ शेळके (३५), अक्षय वसंत घ्यार (२२) हे  लांब फेकले गेले. विशाल याचा जागीच मृत्यू झाला तर अक्षय व ईश्वर हे जखमी झाले. दोघांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर इतर कामगारांनी कंत्राटदार सुपडू पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली, परंतु त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने सर्व कामगारांनी संताप व्यक्त केला. वसंत घ्यार हे कामावर सुपरवायझर होते. दरम्यान,काम सुरु असताना मुख्य वाहिनीचा विज पुरवठा खंडीत करायला हवा होता, तो सुरु ठेवणेच तरुणाच्या जीवावर बेतल्याचा आरोप कामगारांनी केला.

विशाल याचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले होते. तो अविवाहित होता.वडील सोपान उर्फ नुकुल देवचंद गायकवाड, आई छाया मजुरी करतात तर मुलगी सुवर्णा अतुल शिंदे (रा.केकतनिंभोरा, ता.जामनेर) सासरी असते. विशाल हा एकुलता व कमावता मुलगा होता.  मुलाच्या या घटनेने कुटुंबाने प्रचंड आक्रोश केला. मेहुणे, चुलत भाऊ व इतर कुटुंबाने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. 

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यूelectricityवीज