Young man dies after falling leg | केटीवेअरमध्ये पाय घसरून तरुणाचा मृत्यू

केटीवेअरमध्ये पाय घसरून तरुणाचा मृत्यू
पारोळा : तालुक्यातील टोळी येथे २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा केटीवेअर बंधाºयावरून घराकडे जात असताना चिकट शेवाळ वरून पाय घसरला. त्यात पाण्यात पडून त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना २१ रोजी दुपारी दोन वाजता घडली.
पंकज विनायक पाटील (वय २१) व त्याचे काका सुभाष नथू पाटील हे दोघेजण सकाळी त्यांच्या टोळी शिवारातील शेतात निंदणीसाठी गेले होते. दुपारी दोन वाजता पंकज जेवणासाठी घरी जात होता. त्यादरम्यान शेताजवळील बोरी नदीवरील केटीवेअर बंधा?्यावरून जात असताना पाण्याने बंधा?्यावर आलेल्या चिकट शेवाळावर पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याचे काका सुभाष पाटील यांनी पाहिले असता त्यांनी लागेच बंधा?्याच्या पाण्यात उडी घेतली आणि पंकजच्या शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. तो खालीच अडकल्याने त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन तो मृत झाला. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात विलास काशिनाथ पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. मयत पंकजच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
------

Web Title: Young man dies after falling leg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.