जळगावातील कार अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 16:32 IST2020-07-05T16:32:07+5:302020-07-05T16:32:33+5:30
अपघातप्रकरणी कार चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील कार अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू
जळगाव : विद्युत पोलवर धडकलेल्या कारमधील जखमी झालेल्या प्रशांत प्रकाश नायर (२३, रा.अयोध्या नगर) या तरुणाचा रविवारी सकाळी खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
प्रशांत याने पाच दिवस मृत्यूशी झुंज दिली. एमआयडीसीतील राका फर्निचरजवळ १ जुलै रोजी पहाटे ५ वाजता भरधाव कार (क्र.एम.एच.२ बी.जी.३०७८) विद्युत पोलवर धडकली होती. या घटनेत प्रशांत प्रकाश नायर व ज्ञानेश्वर एम चव्हाण (२०, रा.सुप्रीम कॉलनी) हे दोघं तरुण जखमी झाले होते. या दोघांवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी प्रशांतची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, या अपघातप्रकरणी कार चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे तंत्रज्ञ फारुख तडवी यांनी फिर्याद दिली आहे. आता नवीन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास अतुल पाटील करीत आहेत.