शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 15:36 IST

रईस हा भंगार गोळा करण्याचे काम करीत होते. दररोज दुचाकीवरुन फिरत परिसरातील गावांमधुन भंगार गोळा करायचे. भंगार विक्रीतून येणाऱ्या पैशांतून ते कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते.

जळगाव -  कानळदा येथून ममुराबादला घरी येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने रईस हबीबशहा फकीर (वय ३८, रा.ममुराबाद) हा तरुण जागेवरच ठार झाला. हा अपघात शनिवारी रात्री ९ वाजता कानळदा ते ममुराबाद रस्त्यावर झाला.रईस हा भंगार गोळा करण्याचे काम करीत होते. दररोज दुचाकीवरुन फिरत परिसरातील गावांमधुन भंगार गोळा करायचे. भंगार विक्रीतून येणाऱ्या पैशांतून ते कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, १९ सप्टेबर रोजी ते नेहमीप्रमाणे दुचाकीने कानळदा परिसरतील गावात गेला होता. रात्री ९ वाजता ममुरााबाद येथे घरी येत असताना त्याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. रस्त्यावरील इतर वाहनचालकांच्या लक्षात ही बाब आली. यानंतर त्यांनी ओळख पटवल्यानंतर ममुराबाद येथील रईसच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे रईस यांच्या कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. रईस यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहिण, पत्नी व सहा मुली असा परिवार आहे. या दुर्देवी अपघातात सहा मुलींचा पिता असलेल्या रईस यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरीकांनी हळहळ व्यक्त केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इश्वर लोखंडे तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव