आई-वडिलांच्या पाया पडून तरुणाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:22 IST2021-09-04T04:22:03+5:302021-09-04T04:22:03+5:30
एरंडोल: गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास येथील अमळनेर दरवाजा परिसरातील तरुण शेतकरी दीपक उर्फ समाधान संतोष पाटील ...

आई-वडिलांच्या पाया पडून तरुणाने केली आत्महत्या
एरंडोल: गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास येथील अमळनेर दरवाजा परिसरातील तरुण शेतकरी दीपक उर्फ समाधान संतोष पाटील ( २९, रा. अमळनेर दरवाजा परिसर) याने बसस्थानकातील शौचालयाच्या बाजूला असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली.
आत्महत्या मागचे कारण अजून अस्पष्ट आहे याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक संतोष पाटील याच्या कुटुंबात आई-वडील भाऊ असा परिवार आहे त्याच्याकडे चार बिघे शेती असून तो अविवाहित आहे. गुरुवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे तो बसस्थानकाकडे निघाला. त्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे घरात थांबून आई-वडिलांच्या पाया पडला. दीपक हा रात्री बराच वेळपर्यंत घरी परतला नाही म्हणून त्याचा शोध घेण्यात आला शेवटी बसस्थानक आवारात निंबाच्या झाडाखाली गर्दी दिसली त्यावेळी त्या ठिकाणी दीपकची ओळख पटली.
अंतुर्ली येथे वृद्धाची आत्महत्या
अमळनेर : तालुक्यातील अंतुर्ली येथे एका ७२ वर्षीय वृद्धाने पत्री शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. दामू रतन भिल असे या इसमाचे नाव आहे. दीपक महादू भिल याने फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हे.कॉ. किशोर पाटील करीत आहेत.