पिंप्राळ्यात तरुणाची नैराश्यातून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST2021-01-25T04:17:27+5:302021-01-25T04:17:27+5:30
जळगाव : पिंप्राळा परिसरातील पांढरी प्लॉट भागात आनंद शंकर पाटील (वय ३०) या प्लंबर असलेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास ...

पिंप्राळ्यात तरुणाची नैराश्यातून आत्महत्या
जळगाव : पिंप्राळा परिसरातील पांढरी प्लॉट भागात आनंद शंकर पाटील (वय ३०) या प्लंबर असलेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद पाटील हा तरुण पत्नी आरती व दोन मुलींसह वास्तव्यास होता. पत्नी आरती काही दिवसांपासून पाचोरा तालुक्यातील माहेरी गेली आहे. रविवारी सकाळी पांढरी पट्टी भागातील एक रहिवाशी घरी आले असता, आनंद याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर त्याने शेजारीच राहणार्या आनंदचा भाऊ यास प्रकार कळविला. त्यांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पाटील यांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे हवालदार लिलाधर महाजन यांनी पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पाटील यांनी दिलेल्या खबरीवरुन रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.