शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची ५ लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:37 IST

गुन्हा दाखल : नातेवाईकाकडूनचं फसवणूक

जळगाव - मुलाला आरोग्य खात्यात चालक म्हणून लावून देण्याचे आमिष दाखवत कुसुंबा रायपूर येथील सेवानिवृत्त रेमंड कर्मचारी मधुकर नारायण बाविस्कर यांची त्यांच्याचं जवळच्या नातेवाईकाने ५ लाख ६० हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मामेभाऊ एकनाथ उर्फ छोटू आनंदा सोनवणे (रा. केकतनिंभोरा ता.जामनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील कुसूंबा येथील मधुकर नारायण बाविस्कर हे रेमंड कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. पत्नी दोन मुले व सून असा त्यांचा परिवार आहे. मोठा मुलगा त्याच्या कुटुंबासह नाशिक वास्तव्यास आहे. लहान मुलगा महेश चालक म्हणून खासगी नोकरी करतो. मधुकर बाविस्कर यांना नातेवाईक मामेभाऊ एकनाथ उर्फ छोटू आनंदा सोनवणे याने त्यांचा मुलगा महेश याला चालक म्हणून आरोग्य खात्यात लावून देतो असे सांगून १० लाख रुपए लागतील असे सांगितले. त्यावर ९ लाख रुपए देईल असे सांगितल्यानंतर मधुकर बाविस्कर यांनी ११ नोव्हेंबर २०१४ रोजी एकनाथ सोनवणे यांना सुरूवातीला १ लाख रुपए रोख आणि मुलाचे सर्व कागदपत्रे नातवाईक सोनवणे यास दिले.पूर्ण पैसे द्या, आॅर्डर देतोकाही महिन्यानंतर मधूकर बाविस्कर यांनी पुन्हा १४ सप्टेंबर २०१५ रोजी सोनवणे यास ५० हजार रुपए दिले. तेव्हा बाविस्कर यांनी मुलास नोकरी केव्हा लागेल अशी विचारणा केली, त्यावर सोनवणे याने तुम्ही मला संपूर्ण पैसे द्या, मी तुमच्या मुलास आरोग्य खात्यात वाहन चालक म्हणून आॅर्डर काढून देतो, असे उत्तर दिले. यानंतर बाविस्कर यांनी सोनवणेवर विश्वास ठेवून २४ फेब्रुवारी २०१६ रोजी १ लाख रुपए, २४ मार्च २०१६ रोजी २ लाख ४५ हजार रुपए, १६ जुन २०१६ रोजी प्लॉट विकून १ लाख २५ हजार रुपए, २१ जुन २०१७ रोजी पुन्हा प्लॉट विकून १ लाख ५० हजार रुपए, २४ जुलै २०१६ रोजी १ लाख ३० हजार रुपए असे एकुण ९ लाख रुपए दिले.आॅर्डरची विचारणा करताच केली शिवीगाळ३० आॅक्टोबर २०१७ रोजी बाविस्कर हे मुलासह जामनेर येथील बसस्थनाकावर सोनवणे यास भेटले. त्याला नोकरीची आॅर्डर कधी देतो, अशी विचारणा केल्यावर बाविस्कर यांना उलट सुलट शिवीगाळ केली, नातेवाईकांमध्ये माझी बदनामी करतो काय? तुझ्याने जे होईल ते करुन घे, असे अरेरावी करुन धमकी दिली व निघून गेला. पैसे करत करण्याचा तगादा लावल्यावर सोनवणे याने पैसे परत करण्याबाबत नोटरी करुन दिली. व त्यानुसार एकदा २ लाख तर दुसऱ्यांदा १ लाख ४० हजार असे एकूण ३ लाख ४० हजार रुपये बाविस्कर यांना परत केले. उर्वरीत पैसे आज देतो उद्या देतो, असे म्हणत उर्वरीत ५ लाख ६० हजाराची रक्कम परत केली नाही़ पैसे करत नसल्याचे लक्षात आल्यावर बाविस्कर यांनी अखेर १२ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीबाबत तक्रार दिली. त्यावरुन एकनाथ सोनवणे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एकनाथ उर्फ छोटू आनंदा सोनवणे यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे़ 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव