सुरत रेल्वे गेटजवळ तरुणाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST2021-07-26T04:15:37+5:302021-07-26T04:15:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काही कारण नसताना मंगेश सुभाष काजवे (२४, रा. राजमालती नगर) या तरुणाला पाच ते ...

Young man beaten to death near Surat railway gate | सुरत रेल्वे गेटजवळ तरुणाला बेदम मारहाण

सुरत रेल्वे गेटजवळ तरुणाला बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काही कारण नसताना मंगेश सुभाष काजवे (२४, रा. राजमालती नगर) या तरुणाला पाच ते सहा जणांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजता सुरत रेल्वे गेटजवळ घडली असून जखमी तरुणावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.

मंगेश काजवे हा तरूण शनिवारी रात्री आठ वाजता सुरत रेल्वे गेटजवळ दुचाकीवर बसलेला होता. गेट उघडण्याची वाट पाहत असताना, मागून पाच ते सहा तरूण त्याठिकाणी आले व त्यांनी त्याच्याशी कारण नसताना वाद घातला. त्यानंतर लाकडी दांड्याने पाठीवर व डोक्यावर बेदम मारहाण केली. यात मंगेश गंभीर जखमी झाला. ही घटना कुटुंबीयांना व मित्रांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी मंगेशला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, सायंकाळी दोन तरूण घरी येऊन मुलाची विचारणा करीत होते, अशी माहिती मंगेशच्या आईने दिली.

Web Title: Young man beaten to death near Surat railway gate