शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 12:37 IST

जळगाव : मेहरुण तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या १७ वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणात विशाल संतोष भोई (२१, रा.रामेश्वर कॉलनी) याला ...

जळगाव : मेहरुण तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या १७ वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणात विशाल संतोष भोई (२१, रा.रामेश्वर कॉलनी) याला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने त्याला २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, विशाल याने तरुणीला गणपती नगरातून पळवून नेण्यासह कोल्हे हिल्स बंगल्याच्या परिसरात नेल्याचेही उघड झाले असून पोलिसांकडे तसे पुरावेही आहेत.तांबापुरात राहणारी तरुणी व तिची आई रविवारी, १९ रोजी सकाळी ११ वाजता गणपती नगरातील रोहीत मनोहरलाल नाथानी यांच्याकडे धुणीभांडी करायला गेले होते. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्ड व प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार ही तरुणी विशालसोबत गेली होती. त्यानंतर नाथानी यांच्याकडेच काम करणाºया हरिविठ्ठल नगरातील एका महिलेला ही तरुणी कोल्हे हिल्स परिसरातील बंगल्याकडे दुपारी चार वाजता विशालसोबत दिसली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी ती मेहरुण तलावात नातेवाईकांना मृतावस्थेत आढळून आली. तरुणीने त्याच दिवशी तलावात आत्महत्या केल्याचा संशय असून गुन्हा दाखल करण्यात आला.अपहरणाच्याच गुन्ह्यात दोन कलम वाढविले१९ रोजीच या प्रकरणात तरुणीला फूस लावून पळविले म्हणून अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात आता विशाल याला आरोपी करण्यासह वाढीव ३०६ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियिम २०१२ चे कलम १२ चे कलम (पोक्सो) लावण्यात आले. चौकशीत आणखी कलम वाढण्याची शक्यता आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून यात आणखी कोणाचा सहभाग होता का याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी विशाल याला न्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव