विचित्र अपघातात तरुण ठार, दुसरा भाऊ गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST2021-01-19T04:18:35+5:302021-01-19T04:18:35+5:30

जळगाव : चोपडा शहरातून कमळगाव येथे दुचाकीने जात असलेल्या दोन भावंडांचा सोमवारी दुपारी १२ वाजता मंगरूळ फाट्याजवळ विचित्र अपघात ...

Young killed in bizarre accident, second brother seriously injured | विचित्र अपघातात तरुण ठार, दुसरा भाऊ गंभीर जखमी

विचित्र अपघातात तरुण ठार, दुसरा भाऊ गंभीर जखमी

जळगाव : चोपडा शहरातून कमळगाव येथे दुचाकीने जात असलेल्या दोन भावंडांचा सोमवारी दुपारी १२ वाजता मंगरूळ फाट्याजवळ विचित्र अपघात झाला. यात शुभम शिवलाल धनगर (वय १८, रा. चोपडा) याचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश रवींद्र धनगर (वय २०, रा. चोपडा) हा गंभीर जखमी झाला आहे. शुभम व गणेश हे दोघे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम व गणेश सोमवारी दोघे जण कामानिमित्त दुचाकीने कमळगाव येथे निघाले होते. मंगरूळ फाट्याजवळ आल्यानंतर त्यांच्या समोरून येणाऱ्या ट्रकने रिक्षास धडक दिली. यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला सरकला. यानंतर दुचाकी एका ट्रॅक्टरवर आदळली. या अपघातात शुभमचा जागेवरच मृत्यू झाला. तर गणेशच्या उजवा पाय, चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून शुभमला मृत घोषित केले. दहावीपर्यंत शिक्षण झालेला शुभम सध्या शेतीकाम करून कुटुंबियांना मदत करीत होता. कुटुंबीय, नातेवाइकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Young killed in bizarre accident, second brother seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.