आॅनलाईन लोकमतपातोंडा, ता.अमळनेर, दि. १० - रुंधाटी येथून नाशिक येथे कलिंगड (डांगर) घेऊन जात असतांना येथून जवळच असलेल्या दापोरी येथील विवाहित तरुणाचा चा अपघात होऊन जागीच ठार झाल्याची घटना ९ रोजी रात्री मालेगाव जवळील टेहरा गावा जवळ घडली. नंदलाल रघुनाथ पाटील रा. दापोरी बुद्रुक असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर कलिंगड मालक नरेंद्र मधुकर पवार (४४) रा. रुंधाटी यांना गंभीर दुखापत झाली आहे.रुंधाटी येथील नरेंद्र पवार यांनी दापोरी येथील नंदलाल रघुनाथ पाटील यांची चारचाकी नाशिक येथे कलिंगड (डांगर) घेऊन जाण्यासाठी भाड्याने लावली होती. सोमवारी रात्री नाशिक येथे जात असतांना त्यांनी अमळनेर हून एकाला (नाव माहित नाही) वाहन चालवण्यासाठी सोबत घेतले. सदर त्यांच्या वाहनाने समोर उभ्या असलेल्या एम एच ४६, ए आर २३०५ या ना-दुरुस्त वाहनाला मागून धडक दिली. अपघातात दापोरी येथील नंदलाल पाटील हे जागीच ठार झाले. नरेंद्र पवार यांना गंभीर दुखापत झाली आहे.तिसरा अमळनेर येथील वाहन चालवणारा ड्रायव्हर फरार आहे.नंदलाल पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुली, एक मुलगा, असा परिवार आहे. ते गुलाब रघुनाथ पाटील यांचे लहान बंधू होत. या दुर्घटनेमुळे दापोरी बुद्रकु गावावर शोककळा पसरली आहे.
मालेगाव जवळ अपघात दापोरीचा तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:22 IST
रुंधाटी येथून नाशिक येथे कलिंगड (डांगर) घेऊन जात असतांना येथून जवळच असलेल्या दापोरी येथील विवाहित तरुणाचा चा अपघात होऊन जागीच ठार झाल्याची घटना ९ रोजी रात्री मालेगाव जवळील टेहरा गावा जवळ घडली.
मालेगाव जवळ अपघात दापोरीचा तरुण ठार
ठळक मुद्देकलिंगड घेऊन जात असताना झाला अपघातएकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला.शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार