वीज पडून युवा शेतकरी ठार
By Admin | Updated: June 5, 2016 20:14 IST2016-06-05T20:14:18+5:302016-06-05T20:14:18+5:30
वीज पडून २७ वर्षीय युवा शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना रविवारी गारडगाव येथे घडली.

वीज पडून युवा शेतकरी ठार
ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. 5- वीज पडून २७ वर्षीय युवा शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना रविवारी गारडगाव येथे घडली. या घटनेत शेतकऱ्याचा एक बैलही ठार झाला आहे.
तालुक्यातील गारडगाव येथील ज्ञानेश्वर सुपडाजी वाडेकर वय २७ हा शेतातून जनावरे घेवून असताना दुपारी २ वाजताचे सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामध्ये घरी रस्त्याने येत असताना ज्ञानेश्वर वाडेकर यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. तर त्यांच्या शेजारी असलेल्या १ बैलही ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक ज्ञानेश्वर वाडेकर यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ व पत्नी आहे. मागील दोन वर्षापूर्वीच ज्ञानेश्वरचे लग्न झाले होते.त्यांच्या अकाली निधनाने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.