चोरवडला तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 14:57 IST2019-04-20T14:57:17+5:302019-04-20T14:57:30+5:30

घरातच घेतला गळफास

Young farmer suicides in Chorwad | चोरवडला तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

चोरवडला तरुण शेतकऱ्याची आत्महत्या


पारोळा- तालुक्यातील चोरवड यथील नरेंद्र लक्ष्मण पाटील (वय २७) या तरुण शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून नैराश्यातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १९ रोजी सकाळी लक्षात आली. याबाबत वडील लक्ष्मण खुशाल पाटील यांच्या फियार्दीवरून पारोळा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस पाहिजे तसा न झाल्याने दीड लाख रुपए कर्ज विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे होते. तसेच यंदा नरेंद्र यांचे लग्न करायचे होते व मुली पाहणे देखील सुरू होते. पण त्याआधीच नरेंद्र याने जीवन यात्रा संपविली, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिल.
त्याच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, आई,वडील असा परीवार आहे. शोकाकुल वातावरणात नरेंद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले .

Web Title: Young farmer suicides in Chorwad