शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशीच्या विषारी डंखाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; जळगावमधील पहूर येथील दुर्दैवी घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 18:16 IST

अमजदखॉं पठाण यांचे शेंगोळे रस्त्यावर शेत आहे.

- मनोज जोशी

जळगाव : मधमाशीने जिभेला चावा घेऊन घशात डंख मारला. यामुळे श्वास घेणे असह्य झाल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास लोंढ्री बुद्रूक ता. जामनेर येथे घडली. अमजद खाँ अस्लम खाँ पठाण(२८, रा. लोंढ्री बुद्रूक ता. जामनेर )असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमजदखॉं पठाण यांचे शेंगोळे रस्त्यावर शेत आहे. सोमवारी सकाळी १० वाजता ते मजुरांसाठी जेवणाचे डबे घेऊन ते दुचाकीने शेतात गेले होते.  त्यानंतर  घराकडे निघाले होते.  वाटेत त्यांच्या जिभेला मधमाशीने चावा घेऊन ती घशात गेली. यामुळे त्यामुळे असह्य वेदना होण्यास सुरुवात झाली.  श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.   प्राथमिक उपचार मिळेपर्यत त्यांचा मृत्यू झाला होता.  त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुले, मुली  व भाऊ असा परिवार आहे. लोंढ्री गावात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. पठाण हे पहूर येथील अजमुद्दीन शेख यांचे जावई होत.                 डंख करणारी मधमाशी आग्या मोहाळामधील असावी.  मधमाशीने घशात डंख मारल्यावर  तिथे सूज येते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.  मधमाशीचा डंख विषारी असल्याने शरीरातील अवयव निकामी होऊन रक्तचाप कमी होतो.  यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला.   शेतकऱ्यांनी शेतात जातांना चेहरा, तोंड, नाक रुमालाने झाकून घ्यावे आणि स्वत:ची काळजी घ्यावी. - डॉ. नजमुद्दीन तडवी,  वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय पहूर, ता.जामनेर.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू