विजेचा शॉक लागून तरुण शेतकरी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:19 IST2021-01-16T04:19:52+5:302021-01-16T04:19:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या राकेश हिंमत जाधव (२४, रा. विटनेर, ता. जळगाव) या तरुणाचा ...

विजेचा शॉक लागून तरुण शेतकरी मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या राकेश हिंमत जाधव (२४, रा. विटनेर, ता. जळगाव) या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास विटनेर शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.
राकेश जाधव हा तरुण गॅरेज चालवून व सोबत शेती करून कुटुंबीयांना उदरनिर्वाहात हातभार लावायचा. शुक्रवारी सकाळी राकेश हा शेतात पाणी पाजण्यासाठी गेला होता. सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास पाण्याची मोटार सुरू करत असताना त्याचा विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार ग्रामस्थांना व कुटुंबीयांना कळताच त्यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात वाहनांतून हलविले. तपासणीअंती त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. राकेशच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मोठा भाऊ, वहिनी असा परिवार आहे.