आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२४ : धावत्या रेल्वे मालगाडीसमोर उभे राहून तुषार शिवलाल गालफाडे (वय २७, रा.हौसिंग सोसायटी, शाहू नगर, जळगाव) या तरुण अभियंत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री १.१५ वाजता भोईटे रेल्वेगेटजवळ घडली. तुषार याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र तो मानसिक तणावाखाली राहत असल्याची माहिती मिळाली. तुषार हाजिल्हा वाहतूक शाखेचे हवालदार शिवलाल पंडित गालफाडे यांचा मुलगा होता.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री १.१५ वाजता भोईटे रेल्वे गेटपासून काही अंतरावर एक तरुण धावत्या रेल्वेसमोर आला व त्यात त्याचा जीव गेल्याची माहिती मालगाडीचे लोकोपायलट यांनी स्टेशन मास्तर डी.एम.पारधी यांना कळविली. त्यानुसार पारधी यांनी लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळावर गेलेल्या पोलिसांनी रात्रीच पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगावातील तरुण अभियंत्याची रेल्वे खाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 20:05 IST
धावत्या रेल्वे मालगाडीसमोर उभे राहून तुषार शिवलाल गालफाडे (वय २७, रा.हौसिंग सोसायटी, शाहू नगर, जळगाव) या तरुण अभियंत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री १.१५ वाजता भोईटे रेल्वेगेटजवळ घडली.
जळगावातील तरुण अभियंत्याची रेल्वे खाली आत्महत्या
ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदभोईटे रेल्वे गेटजवळील मध्यरात्रीची घटनामयत पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा